श्रीरामपूर

श्रीरामपूर मधून काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर! आ.लहू कानडे यांच्या ऐवजी हेमंत ओगलेंची उमेदवारीची मागणी; नाहीतर…..

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News: अहिल्यानगर जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती ही पक्षांसाठी खूपच बिकट अशी होत असून बऱ्याच विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो.

अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी मतदारसंघापासून ते श्रीगोंदा मतदार संघ व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी असो की महायुती यामध्ये बंडखोरी होईल असे सध्या चित्र दिसून येत आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ बघितला तर हा राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ असून या मतदारसंघावर सध्या काँग्रेसचे लहू कानडे हे विद्यमान आमदार आहेत.

एकंदरीत पाहता काँग्रेसची सत्ता या विधानसभा मतदारसंघावर सध्या असून  या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल हे निश्चित मानले जात आहे.

परंतु आता लहू कानडे यांना पक्षातीलच अंतर्गत वादाचा सामना करावा लागेल अशी चिन्हे दिसून येत आहेत. कारण काँग्रेसचे देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असून विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या ऐवजी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे व उमेदवारी दिली नाही तर हेमंत ओगले काही वेगळी भूमिका घेतील असे देखील बोलले जात आहे.

 श्रीरामपूर मधून काँग्रेसला करावा लागू शकतो बंडखोरीचा सामना

याबाबत सविस्तर वृत्त असे की,अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा एक महत्त्वाचा मतदारसंघ असून यावर सध्या काँग्रेसचे सत्ता आहे व या ठिकाणी काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. लहू कानडे आहेत.

त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत लहू कानडे यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानले जात आहे. परंतु या पार्श्वभूमीवर मात्र काँग्रेसमधीलच अंतर्गत वाद उफाळून आला असून काँग्रेसचे देशपातळीवर काम पाहणारे हेमंत ओगले हे विधानसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असून काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांच्या ऐवजी मला उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जर उमेदवारी मिळाली नाही तर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे देखील बोलले जाते.

 भाजप आणि शिंदे सेनेत देखील बंडखोरी होण्याची शक्यता?

महाविकास आघाडीच नाही तर महायुतीकडून देखील शिंदे गट आणि भाजपाकडून श्रीरामपूर विधानसभा लढण्यासाठी तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

यामध्ये शिंदे गटातील नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे पुत्र प्रशांत लोखंडे यांच्यामध्ये श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीत देखील फूट पडते की काय अशी शक्यता श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात आहे.

 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे 2019 चे चित्र काय होते?

2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत श्रीरामपूरमध्ये पाहायला मिळाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या माध्यमातून लहू कानडे 93 हजार 906 मतांनी विजयी झाले होते. तर सेनेचे भाऊसाहेब कांबळे यांना 18994 मतांनी पराभव पत्करावा लागला होता.

Ajay Patil

Published by
Ajay Patil