Railway Station Fact:- भारतीय रेल्वे हे वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठे नेटवर्क असून उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंत आणि पूर्वपासून तर पश्चिम पर्यंत भारतात रेल्वेचे जाळे विस्तारले आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून दररोज लाखोच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात.
त्यासोबतच औद्योगिक आणि कृषी क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून देखील रेल्वेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवासी वाहतुकी सोबतच मालवाहतुकीत देखील भारतीय रेल्वेचा मोठा वाटा आहे. परंतु भारतीय रेल्वेचा विचार केला तर अनेक स्टेशन्स किंवा रेल्वे मार्ग हे विविध अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी आहेत.
यामध्ये आपल्याला माहित आहेच की काही रेल्वे स्टेशन अशी आहेत की त्या ठिकाणी उतरून तुम्हाला दुसऱ्या देशात प्रवेश करता येतो. तसेच भारतामध्ये अशी रेल्वे स्टेशन देखील आहेत की त्या ठिकाणी दोन राज्यांच्या सीमा देखील जोडल्या गेलेल्या आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर नवापूर रेल्वे स्टेशन हे गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे.
म्हणजे हे स्टेशन अर्धे गुजरात राज्यात आहे व अर्धे महाराष्ट्रात आहे.म्हणजेच भारतामध्ये अशी अनेक रेल्वे स्टेशन आहेत की ते त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांमुळे खूप प्रसिद्ध व इतर रेल्वे स्टेशन पेक्षा वेगळेपण जपून आहेत.
अगदी याच पद्धतीने जर आपण भारतामध्ये म्हणजेच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात अशी रेल्वे स्टेशन आहेत की एकच ठिकाणी आहेत परंतु नावे दोन आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन असल्यामुळे बऱ्याचदा प्रवाशांचा या ठिकाणी खूप मोठा गोंधळ उडतो. या रेल्वे स्टेशन बद्दलच आपण या लेखात माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्रातील या ठिकाणी आहे एकाच ठिकाणी दोन रेल्वे स्टेशन
अहमदनगर जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असलेली ही दोन रेल्वे स्टेशन असून त्या स्टेशनची नावे जर पाहिली तर ती म्हणजे एकाचे नाव बेलापूर आणि दुसऱ्याचे नाव श्रीरामपूर असे आहे. हे दोन्ही स्टेशन एकच ठिकाणी आहेत. परंतु फरक एवढाच आहे की एक ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहे. आपण आजपर्यंत बरेच रेल्वे स्टेशन पाहिले असतील.
रेल्वे स्टेशनला एकच नाव देण्यात आलेले असते. परंतु अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या या रेल्वे स्टेशनवर मात्र दोन नावे असल्यामुळे खूप वेळा गोंधळ उडतो. तुम्हाला जर या स्टेशनवरून एखादी गाडी पकडायचे असेल तर तिकीट घेण्यापूर्वी तुम्हाला ट्रेन कोणत्या प्लेटफॉर्मला येणार आहे हे व्यवस्थित समजून घेणे खूप आवश्यक आहे.
कारण श्रीरामपूर आणि बेलापूर ही स्थानके एकच ठिकाणी आहेत. फक्त फरक एवढाच आहे की ही दोन्ही स्थानके ट्रॅकच्या विरुद्ध बाजूस आहे. बेलापूर आणि श्रीरामपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन असून शिर्डी तसेच अहमदनगर व औरंगाबाद या रेल्वे स्टेशनशी जोडले गेलेले आहेत.