अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तलावात महिलेची आत्महत्या

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  श्रीरामपूर येथील गोंधवणी रोडवरील स्वप्ननगरी वसाहतीमधील रहिवासी महिला विजया सदाशिव जगताप हिने साठवण तलाव क्रमांक एक मध्ये शुक्रवारी रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली.

या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत सदर महिलेचा तलावात शोध घेतला.

मात्र रात्री महिलेचा मृतदेह मिळाला नाही. शनिवारी सकाळी तो मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. त्यांनी गोंधवणी रोड भागातील कॉन्स्टेबल पवार यांना माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe