म्हणूनच आमदार काळे प्रत्येक ठिकाणी नारळ वाढवून त्याचे श्रेय घेतायत

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- कोपरगांव पालिकेची निवडणुक आली म्हणून आमदार आशुतोष काळे यांची जीभ व पायाखालची वाळू घसरायला लागल्याने ते प्रसिध्दीच्या हव्यासापोटी कोल्हे कुटूंबियाविरूध्द गरळ ओकत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दोन वर्षे आमदार काळेंनी मतदार व त्यांच्या प्रश्नांना वाळीत टाकुन फक्त फोटोनटसम्राट म्हणून वाहवा मिळविली अशा शब्दात जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी काळेंवर टीका केली आहे. शहरातील भाजपा पक्ष कार्यालयात विवेक कोल्हे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेत आमदार काळे यांच्या चित्रफित आरोपाचा समाचार घेत प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिले.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, भाजपाच्या सचिव व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात केंद्र व राज्य शासनांच्यामाध्यमांतुन कोपरगांव मतदार संघाच्या विकासाचे प्रत्येक प्रस्ताव मार्गी लावत निधी आणले आहेत. म्हणूनच आमदार काळे प्रत्येक ठिकाणी नारळ वाढवून त्याचे श्रेय घेत आहेत.

Advertisement

निवडणुक जिंकण्यांसाठी त्यांनी कोपरगांव शहरवासियांना पाचव्या साठवण तळयाचे गाजर दाखविले, निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पाईपलाईन पाणी पुरवठा योजनेला न्यायालयाच्या माध्यमांतुन खोडा घातला. वाढते औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरणामुळे पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहे.

त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्याकडुन विधीमंडळ कामकाजाच्या माध्यमांतून पाणी आरक्षण घेत निळवडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त ३६० कोटी रूपये खर्चाची पाईपलाईन कोल्हे यांनी मंजुर करुन आणली पण त्याचे सर्व श्रेय कोल्हेंना जाईल या भितीपोटी या योजनेला खोडा घातला.

पण साईबाबांचा आर्शिवाद कोपरगांव मतदार संघाच्या पाठीशी आहे. आता आमदार काळे हेच त्याचे अध्यक्ष झाले आहेत, तेंव्हा त्यांनीच या योजनेचे भूमिपुजन करून दररोज कोपरगांव शहरवासियांना प्यायला पाणी द्यावे आणि वाचलेल्या पाण्यांतुन गोदावरी कालव्यांना शेतीसाठी एक जादा पाण्यांचे आर्वतन नियोजन करावे. असे कोल्हे शेवटी म्हणाले.

Advertisement