अहमदनगर उत्तर

नगरसेवक पुत्राची बनावट क्लिपद्वारे करत होता बदनामी; आता हवा खातोय पोलीस कोठडीची

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :-  बदनामी करण्याच्या हेतूने नेवासे शहरातील प्रतिष्ठीत व्यावसायिक व नगरसेवक पुत्राचा चेहरा वापरुन व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओ मध्ये अश्लिल हावभाव करणारे चित्रीकरण तयार केले.

तयार केलेला तो व्हिडिओ नेवासा भागातील नागरिकांच्या व्हाट्सअप, फेसबुक तसेच सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करीत असल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यास अटक केले.

संशयित आरोपीस पुण्यामधून अटक करण्यात आले. आरोपीस नेवासे येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने (ता. ७) फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. निखील रविकिरण पोतदार ( वय २७, मूळ राहणार नांदेड, हल्ली राहणार सदाशिव पेठ पुणे) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून बदनामी होत असल्या प्रकरणी एका समाजाचे वतीने नेवासे पोलिसांना निवेदन दिले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे व नेवाशाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले.

श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस कार्यालयातील सायबर शाखेच्या मदतीने तांत्रिक पुराव्याच्या आधारे निष्पन्न आरोपी निखील पोतदार यास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलिस नाईक, अशोक कुदळे, कॉन्स्टेबल अंबादास गिते, केवल रजपुत यांच्या पथकाने अटक केली.

नेवाशातील लुटारूही अटकेत नेवासे बस स्थानकात आपल्या गावी जाण्यासाठी बसची वाट पाहत ज्ञानदेव यशवंत बर्डे ( रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) बसले होते.

आरोपी रॉकी रमेश चांदणे याने ज्ञानदेव यशवंत बर्डे यांना नेवासे शहरातून नेवासे फाट्यापर्यंत (ता.१७) आक्टोबर २०२१ रोजी लिफ्ट दिली. आरोपीने वाटेतचं रस्त्यावरील काझी नाला येथे दमदाटी करत चॉपरचा धाक दाखवत लुटले.

बेकायदेशीर शस्र बाळगणे, लुटणे, जबरी चोरी करणे अशा प्रकरणी नेवासे पोलिसांनी यातील आरोपी रॉकी रमेश चांदणे (वय-२३, राहणार लक्ष्मीनगर,नेवासे शहर) याला तांत्रिक तापासवरून अटक करण्यात आली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office