भाविकांच्या गर्दीने शनिशिंगणापुरातील अर्थकारणाला मिळणार वेग

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाली असून आता भाविक देखील दर्शनाचा लाभ घेतग आहे. यातच जगविख्यात असलेले शनिशिंगणापुरात शनिवारी लाखो भाविकांनी गर्दी करत दर्शन घेतले.

दरम्यान कोरोनामुळे गेली अनेक दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. शनिवारी भाविकांनी दिवसभर दर्शनसाठी गर्दी केली होती.

करोनाचा प्रभाव कमी झाल्याने तसेच दुसरा शनिवार, रविवार सुट्टी, त्यामुळेच गर्दीचा उच्चांक पाहावयास मिळला. दर्शन रांगेतील भाविकांना दर्शनासाठी तासन्तास उभे रहावे लागले.

देवस्थान ट्रस्टने दर्शन व्हावे यासाठी उपाययोजना केल्या होत्या. करोनाच्या संकटामुळे भाविकांनी शनिशिंगणापूरात पाठ फिरवली होती.

मात्र शनिवारी पहाटेपासून दिवसभर लाखो भाविकांनी हजेरी लावल्याने परिसरात जिकडे पाहावे तिकडे भाविक दिसत होते. त्यामुळे व्यापरीवर्गही सुखावला.

शनिदर्शन झाल्यानंतर भाविकांनी घरी प्रसाद नेण्यासाठी प्रसाद बर्फी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे अर्थकारण फिरणार आहे.