अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीमुळे जनता यापुढे काळे, कोल्हे सोडून कोणाला मतदान करणार नाही, यांनी अनेक लोकांचे पुढे येण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकले, अशी टीका संजय काळे यांनी नाव न घेता वहाडणे यांच्यावर केली.
कोपरगाव बसस्थानक रस्त्याच्या च्या बाजूने दुमजली गाळे बांधावे, अशी मागणी नगराध्यक्ष वहाडणे यांनी केल्याच्या संदर्भ देत काळे म्हणाले, एसटी स्टँड च्या बाजूला गाळे व्हावेत हे प्रपोजल तयार करा, असे मी वहाडणे यांना निवडून आल्या आल्याच सांगितले होते.
परंतु त्यांना गेल्या पाच वर्षात काहीच करता नाही आले नाही, आता कशाचा मागण्या करतात केवळ गुड फार्मसी काम काही नाही.
परंतु सर्व उपलब्ध असतानाही केवळ वादविवादात यांनी वेळ घालविला व शहरात एकही ठोस काम केले नाही. असेही ते म्हणाले.
२८ कामाच्या नावाखाली एवढा उहापोह केला परंतु आर्थिक सेटलमेंट झाल्यानंतर बिनबोभाट ही कामे सुरू झाली. आठ दिवसांपूर्वी केलेल्या रस्त्यावरची खडी निघू लागली आहे. कामाला क्वालिटीचं नाही. असा आरोप काळे यांनी केला.