अहमदनगर उत्तर

इंधन दरवाढी विरोधात युवासेनेकडून सायकल रॅलीच्या माध्यमातून निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑक्टोबर 2021 :- इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेने महाराष्ट्रात सायकल रँलीच्या माध्यमातून तिव्र निषेध नोदविला आहे.इंधन दरवाढीमुळे जनता त्रस्त झाली असुन ऐन दिवाळीच्या सणात महागाईचा भडका उडाला आहे.

या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात युवा सेनेच्या वतिने शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना सचिव सुरज चव्हाण,

युवासेना सरचिटणीस अमोल भैय्या किर्तीकर,युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई,सहसचिव विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील भैय्या तिवारी ,शिवसेना उत्तर अहमदनगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहरातील युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत तीव्र निषेध नोंदविला.

शिवसेना एस.टी. कामगार सेनेचे शहरप्रमुख भरत मोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवुन रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

इंधन दरवाढ ही १९४७ पासून आज पर्यंतची सर्वात जास्त दरवाढ आहे. हि दरवाढ वर्ल्ड रेकॉर्ड झाली आहे. शेतकरी बांधवांनाही यांचा मोठा फटका बसला आहे. शेतकरी बांधव ट्रक्टरने शेती करायची सोडून पारंपारिक पद्धतीने शेती करत आहे. त्यामुळे शेतीचे उत्पादन घटत आहे.

अशी वाईट परिस्थिती शेतकरी बांधवांवर आली आहे. त्याच बरोबर गॅसची सुरूवातीला मोठी जाहिरात केली. आता गॅसचे भाव वाढवून जनतेला हैराण केले. गॅस सिंलेंडरचे दर १००० रु. केल्यामुळे महिलांना गॅस घेणे परवडत नाही. भाजपाच्या अंधभक्तांनी या महागाईचा विरोध करुन शासनाला जागे करावे.

महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या खांद्याला खादा लावून मोदी सरकारला जाग आणावी. असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी केले आहे.

पुढे शिर्डी लोकसभा विस्तारक सुनिल भैय्या तिवारी म्हणाले की,इंधन दरवाढी विरोधात युवा सेनेच्या वतिने एकाच वेळी आज महाराष्ट्रात सायकल रॅलीच्या माध्यमातून आंदोलन चालु असुन हा गरिब जनतेचा आक्रोश आहे.

हाच जन आक्रोश शासना पर्यत पोहचवत असुन महागाई कमी करावी अशी सदबुध्दी केंद्र शासनाला मिळो. या सायकल रॅलीमध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या रॅलीला उपस्थित तरूणांचे विक्रांत झावरे यांनी आभार मानुन रॅली संपन्न झाली. याप्रसंगी केंद्र शासनाच्या महागाईच्या विरोधात तरूणांनी निषेध नोंदवला आहे.

या रॅलीसाठी विशाल झावरे, वाहतूकसेनेचे जिल्हाप्रमुख इरफान भाई शेख, उपशहरप्रमुख विकास शर्मा, भुषण पाटणकर, गोपाळ वैरागळ, संघटक बाळासाहेब साळुंके, सह संघटक वैभव गिते, समन्वयक योगेश उशीर,विभागप्रमुख मयुर दळवी, दिपक बरदे, विजय शिंदे, निशांत झावरे,

भुषण वडांगळे, मधू पवार,ग्राहक संरक्षण कक्षाचे राहुल देशपांडे, सतिश शिंगाणे, प्रविण देशमुख, वाहतूकसेनेचे अविनाश धोक्रट, पप्पू पेकले, पंकज शिंदे, गणेश थोरात, निखिल मडवई,उमेश छुगाणी,गोविंद चव्हाण,मंगेश देशमुख, वैभव हलवाई,वसिम शेख,संदीप पाटील,

आकाश हलवाई,सुशील धाडीवाल,अभिजीत दरुंटे, संकेत फडे,सिद्धार्थ पांडे,शुभम अनर्थे,कार्तिक बागुल,हरीश जोशी, अक्षय खडांगळे, वेदांत कर्पे, रविंद्र पवार, प्रणित गंडे,

राज जाधव,जाफर पठाण, दत्तात्रय सालकर, दत्तात्रय गिते, रुपेश सालकर, शुभम वाघमारे, पवन वाघ,ओम साळुंके,रेहान शेख याच्यासह युवासेनेचॆ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office