अहमदनगर बातम्या

अहमदनगर कांदा बाजारभाव ; जिल्ह्यात कांद्याला ४ हजारांचा भाव !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :-  नगर जिल्ह्यात कांदा उत्पादक मोठ्या कालावधीपासून चांगल्या बाजारभावाची प्रतीक्षा करत होते.

सध्या शेतात लागवड केलेल्या कांद्याचे जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर जो कांदा शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जतन करून ठेवला होता, त्या कांद्याला आता भाव आला आहे.

राहुरी बाजारसमितीत ५ हजार ३२४ गोणी कांदा आवक झाली होती. त्यात १७८ गोणी एक नंबर कांद्याला तीन हजार ते चार हजारांचा भाव मिळाला.

तर अवघ्या ८४ गोणी कांद्याला अपवादात्मक चार हजारी पारचा भाव मिळाला.

दोन महिन्यांपूर्वी चाळीत ठेवलेल्या कांदा खराब होत असल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणला. पण जो कांदा मागे ठेवला त्याला मात्र, आता चांगला भाव मिळत आहे.

Ahmednagarlive24 Office