अहमदनगर बातम्या

अहमदनगर, पाथर्डी परिसरात भरदिवसा घरफोडी करणारे ‘ते’ दोघे जेरबंद, मोठ्या गुन्ह्याची झाली उकल

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : अहमदनगर, पाथर्डी परिसरात भरदिवसा घरफोडी करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहेत. रोहित नादर चव्हाण (वय 21, रा. चिचोंडी पाटील, ता. नगर) व दुसरा विधीसंघर्षीत बालक असल्याचे समजते. तयन ताब्यात घेताचदोन मोठ्या गुन्ह्यांची उकल झाली.

अधिक माहिती अशी : सोमनाथ म्हातारदेव घुले (वय 35, रा. शेकटे, ता. पाथर्डी) हे २७ सप्टेंबरला घराबाहेर असताना चोरटयांनी त्यांच्या घरातून दागिन्यांसह रक्कम चोरून नेली होती. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर याना पोलीस पथक नेमून घरफोडीच्या गुन्ह्याची उकल करण्यास सांगितले होते. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, सफौ भाऊसाहेब काळे, देवेंद्र शेलार, पोना विंद्र कर्डीले, संतोष खैरे,

पोकॉ भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सागर ससाणे, बाळासाहेब खेडकर, प्रशांत राठोड व चापोहेकॉ उमाकांत गावडे यांचे पथक नेमून कारवाईचे आदेश दिले होते. हे पथक चिचोंडी पाटील परिसरात रेकॉर्डवरील आरोपींची माहिती घेताना काही संशयीत इसम पोलीस पथकास पाहुन पळू लागले.

पोलिसांनी पाठलाग करत वरील आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता सोन्याचे दागिने व रोख रक्कम आढळून आली. त्यांनी घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच अधिक तपासाअंती दोन गुन्हयाची उकल करण्यात पोलिसांना यश आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office