Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रासह जिल्ह्यात आता फक्त विधानसभेचा फिव्हर दिसून येतोय. दररोज विविध घडामोडी घडताना दिसतायेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षासह अनेक प्रमुख पक्षांचे वरील स्तरावरील नेते विविध ठिकाणी भेट देत मार्गदर्शन करत आहेत.
यादरम्यान सत्ताधारी नेते व विरोधी नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतायेत. निवडणुकीच्या कालावधी पर्यंत हे व वातावरण आणखी तापलेले दिसेल.
अहमदनगर जिल्ह्यात आगामी विधानसभा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यात जास्त रंगलेली दिसेल. या दोघांचे राजकीय वैर व संघर्ष सर्वश्रुत आहे.
दरम्यान आता आ. थोरात यांनी संगमनेरमध्ये एक वक्तव्य केले. या वक्तव्याचीच सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. “बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत” असे वक्तव्य आ.थोरात यांनी श्रीरामपूरमधील एका कार्यक्रमात केले आहे.
त्यांनी यावेळी कुणाचे नाव घेतले नसल्याने त्यांचे हे वक्तव्य कुणासाठी होते यावरून विविध चर्चा रंगल्या आहेत.
नेमके काय म्हणाले आ. थोरात?
आ. थोरात श्रीरामपुरात बोलताना म्हणाले, “बाप कितीही मोठा असो, पण वारसदार चांगले असावेत”. ज्या कार्यक्रमात लोक चांगले असतील तो कार्यक्रम नक्कीच चांगला होत असतो.
येथे करण ससाणे असो किंवा त्यांना मानणारी तुमच्यासारखी मंडळी असू द्या, संघर्ष, अडचणी असतातच पण तरीही चांगलं काम करता येतं हे तुम्ही दाखवलंय असे ते म्हणाले.