अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : शरद पवारांची अहमदनगरसाठी मोठी रणनीती ! विधानसभेला कुणाला तिकीट देणार ‘ते’ही सांगून टाकलं, जगताप लंके यांना…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Ahmednagar Politics : लवकरच लोकसभा निवडणूक लागेल. लोकसभा झाली की विधानसभा निवडणूक जाहीर होतील. त्यामुळे आता शरद पवार यांनी मोठी व्यूहरचना आखण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अनेक आमदार अजित पवारांसोबत गेले.

त्यामुळे स्वतः शरद पवार मैदानात उतरले आहेत. अजित पवार गटातील आमदारांना शह देण्यासाठी तसेच जास्तीत जास्त आमदार निवडणून आणण्यासाठी शरद पवार तयारीला लागले आहेत.

गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी माणसे शोधण्याचे काम

त्यादृष्टीने अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार यांनी आपली राजकीय गणिते आखण्यास सुरवात केली आहे. अजित पवार गटाकडे गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी माणसे शोधण्याचे काम देखील सुरु केले आहे.शेवगाव- पाथर्डी आणि श्रीगोंदा, या दोन मतदारसंघांसाठी शरद पवार गटाने दावा केला आहे. तसेच अकोले व कोपरगावमध्येही सक्षम उमेदवार देण्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

विधासनसभेला शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी ?

नगर दक्षिण लोकसभेसाठी विखेंविरोधात सक्षम पर्याय देणे गरजेचे आहे. तशी व्यूहरचना शरद पवार गटाने आखण्यास सुरवात केली आहे. यानंतरच्या होणाऱ्या विधानसभेसाठी अनेक इच्छुक आहेत. पण जो लोकसभेला मताधिक्य देतील, त्यांनाच तिकीट देण्यात येईल अशी अशी अट शरद पवार गटाने ठेवली असल्याचे समजते.

…तर त्यांना उमेदवारी देऊ नका

या वृत्तास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी देखील दुजोरा दिलाय. विशेष म्हणजे श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप हे शरद पवार गटासोबत असून श्रीगोंद्यातून लोकसभेला मताधिक्य त्यांच्याकडून मिळाले नाही तर त्यांना उमेदवारी देऊ नका असेही स्पष्टच करण्यात आल्याचे समजते. हा नियम सर्वांसाठी करण्यात आला आहे.

लोकसभेसाठी काय आहे प्लॅनिंग ?

राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभेसाठी प्रथम आमदार नीलेश लंके यांचे नाव पुढे आले. पण, ते आता अजित पवार गटासोबत आहेत. त्यामुळे लंके यांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा थांबली आणि शरद पवार गटाच्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली.

आमदार रोहित पवार यांचे नाव लोकसभेसाठी

या गटाने मुंबईत बैठक घेऊन चाचपणी केली. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत- जामखेड, शेवगाव पाथर्डी आणि राहुरी, असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी नगर शहर, पारनेर, कर्जत-जामखेड आणि राहुरी हे मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहेत.

यातील आमदार संग्राम जगताप व नीलेश लंके हे अजित पवार गटाकडे, तर आमदार तनपुरे व रोहित पवार हे शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे आता येथे आमदार रोहित पवार यांचे नाव लोकसभेसाठी सध्या पुढे येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24