Ahmednagar Politics : राज्य सरकार केवळ घोषणाबाजीचे – माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाविकास आघाडी सरकार असते तर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना २४ तास वीज उपलब्ध झाली असती. हे सरकार केवळ गतिशील शासन म्हणून जाहिरातीद्वारे मीरवत आहे. प्रत्यक्षात कामे मात्र ठप्प आहेत. घोषणाबाजीचे हे सरकार विरोधी बोलणाऱ्या व प्रश्न विचारणाऱ्या आमदार व नेत्यांच्या मागे ईडी चौकशी लावते, अशी टीका माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.

राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील वळण, मानोरी, आरडगाव, मांजरी व पिंपरी बळण या गावच्या जनसंवाद अभियान दौर्‍्याप्रसंगी बळण येथील हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या कार्यक्रमात आमदार तनपुरे बोलत होते. आमदार तनपुरे म्हणाले, कौ आपल्या मंत्रीपदाच्या काळात बाभूळगाव, आरडगाव, ववांजुळपोई या ठिकाणचे सौर ऊर्जा प्रकल्प मार्गी लावले.

त्यात बाबुळगावचा प्रकल्प कार्यान्वित होऊन शेतकऱ्यांना त्या ठिकाणी २४ तास वीज उपलब्ध झाली आहे; मात्र आघाडी सरकार गेल्यानंतर वर्षभरापासून आरडगाव येथील काम बंद आहे. हे सरकार केवळ एसटी आणि अन्य माध्यमातून केवळ गतिशील सरकारच्या जाहिराती देऊन सरकार चांगले असल्याचे भासवत आहे.

रोहित्रांना ऑइल मिळत नसल्याने पंधरा पंधरा दिवस शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. येत्या ९ तारखेला नगर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राष्ट्रवादीच्या सभेसाठी येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक प्रभाकर माकसरे यांनी केले