Ahmednagar Politics : पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपने तीन मोठ्या राज्यात सत्ता मिळवली. या यशामुळे आता भाजप लोकसभेसाठी निश्चित झाले आहे. लोकसभेला भाजप निर्विवाद यश मिळवेल असं सांगितले जात आहे.
आता या विजयाचा परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार आहे. भाजपने आता महाराष्ट्रात लक्ष की केंद्रित केले असून ४५ प्लसचे टार्गेट ठेवले आहे. आणि या ४५ मध्ये मी देखील खासदार असणार असा विश्वासच आ. राम शिंदे यांनी व्यक्त केला हे. दरम्यान त्यांनी जो दावा केला आहे त्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
काय म्हणाले आ. राम शिंदे
आगामी लोकसभेत भाजपचा विजयरथ असाच प्रगतीपथावर राहील. लोकसभा 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचे जे 45 प्लस’ टार्गेट आहे ते नक्कीच पूर्ण होईल. यात मी देखील खासदार असेल असेच ते म्हणालेत.
आता तर त्यांनी दावा नव्हे तर विजयाची खात्रीच दिली आहे. यावेळी त्यांनी क्रिकेटची भाषा वापरत .खा. सुजय विखेंना ओपन चॅलेंजच दिले. ते म्हणाले, सध्या क्रीजवर फलंदाज आहे की नाही, याबाबत अपील झाले असून फिल्डिंग करणाऱ्यांनी फलंदाजाविषयी अपील केले आहे.
यावर आता पक्ष निर्णय घेईल. पण एक गोष्ट खरी की, क्रिझवर असलेला फलंदाज या अपिलामुळे घायाळ झाला असून पुरता घाबरून गेला आहे. त्याला सध्या काही कळत नसून ज्याबरोबर लढला त्यालाच घेऊन पळताना दिसत आहे.
सध्या फलंदाजाने पॅट, ग्लोज सोडले असून हेल्मेटही काढले असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे फलंदाजालाही ठाऊक झालंय की आऊट झालो म्हणून!! असे म्हणत त्यांनी विखे यांच्यावर बोचरी टीका केली.
आ. राम शिंदे यांचा भेटीगाठींवर भर
आ. राम शिंदे यांनी दक्षिणमध्ये संपर्क वाढवला असून ते अनेकांच्या भेटीगाठी घेत आहेत. नुकतेच ते आमदार नीलेश लंके यांच्यासोबत दिसले होते. ते एकमेकांचे कामांचे कौतुक करताना दिसत होते.
तसेच त्यानंतर ते मा. आमदार अरुण जगताप यांच्या देखील भेटीला गेले होते. आ. शिंदे हे महायुतीतील राष्ट्रवादीबरोबर इतर नेत्यांच्या गाठी घेताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या नगर दक्षिणमधील राजकीय वातावरण तापले आहे.
लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी
लोकसभेसाठी सर्व पक्ष तयारीत असून दक्षिणेस मात्र अनेक लोक इच्छुक आहेत. भाजपबरोबरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गट, काॅंग्रेस, शिवसेना ठाकरे गट नगर दक्षिणसाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये लोकसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी सर्वाधिक दिसते. राष्ट्रवादी आणि शिवसेना सध्या उमेदवारांच्या बाबतीत चाचपडत असताना दिसत आहे.