अहमदनगर बातम्या

Ahmednagar Politics : हभप भास्करगिरी महाराज राजकारणात येणार का? स्पष्टच सांगितलं ! केला मोठा खुलासा

Published by
Ahmednagarlive24 Office

श्री क्षेत्र देवगडचे हभप भास्करगिरी महाराज हे आगामी लोकसभा किंवा विधासनभा निवडणुकांच्या आखाड्यात उतरतील अशा चर्चा विविध माध्यमांतून आलेल्या होत्या. परंतु आता त्यांनी स्वतःच यावर खुलासा करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात आदी असे वृत्त प्रसिद्ध झाले ते वाचून मन व्यथित झाले असून वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेची दूर दूर पर्यंत संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कुठलेही राजकीय पद भोगण्याची अभिलाषाही नसून प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्येही आम्ही आज पर्यंत भाग घेतलेला नाही व भविष्यातही भाग घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नेमके काय म्हटले आहे ?:-

हभप भास्करगिरी महाराज यांनी खुलासा करताना असे म्हटले आहे की, १९७५ साली श्री समर्थ सदगुरु किसनगिरी बाबांनी श्री क्षेत्र देवगड येथे देवस्थानचे उत्तराधिकारी म्हणून आमची नियुक्ती केल्यानंतर हरिचिंतन-धर्मकार्य-कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रचार प्रसार आम्ही केला. गुरु आदेशानुसार हे कार्य ५० वर्ष अविरतपणे सुरू असल्याचे ते म्हणाले.

राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारी, वेगवेगळ्या जाती धर्मातील वेगवेगळ्या पक्षातील मातब्बर मंडळी ही रात्रंदिन देश तथा राज्याच्या विकासा साठी प्रयत्नशील असून त्यांच्याकडून हे कार्य उत्तमरित्या घडत राहो ही सदिच्छा असल्याचे ते म्हणाले आहेत.

प्रसारमाध्यमांमध्ये ‘भास्करगिरी महाराज निवडणुकीच्या आखाड्यात आदी असे वृत्त प्रसिद्ध झाले ते वाचून मन व्यथित झाले असून वैयक्तिक आमचा कुठल्याही राजकीय तथा पक्ष संघटनेची दूर दूर पर्यंत संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच कुठलेही राजकीय पद भोगण्याची अभिलाषाही नसून प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेमध्येही आम्ही आज पर्यंत भाग घेतलेला नाही व भविष्यातही भाग घेणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमच्यासाठी सर्व पक्ष सामान :- हा खुलासा करताना त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, सर्व पक्ष आमच्यासाठी समान आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून श्रीराम जन्मभूमी मुक्तीसाठी सुरुवातीच्या कालखंडापासून आम्ही धर्मकार्य म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला असून साधू संतांच्या कृपाशीर्वादाने व जनता जनार्दनाच्या इच्छेने प्रभू श्रीरामांचे भव्यदिव्य मंदिर उभे राहिले यातच आम्हाला आनंद असे ते म्हणाले.

त्याचप्रमाणे राजकारणात प्रवेश करणे हा आमचा विषय नसून स्वप्नातही याबाबत कधी विचार केली नाही. त्यामुळे आम्ही राजकारणात येणार यात काही तथ्य नसून याबाबत कुठलाही गैरसमज करू नये असे म्हटले आहे.

Ahmednagarlive24 Office