अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :- राजेंद्र नागवडे यांनी सांगितले होते की माझ्या मालकीचे खाजगी कारखाने तसेच कंपन्या असतील तर मी स्वत: राजीनामा देईल मग पुणे येथील श्री लक्ष्मी नरसिंह शुगर, ग्रामलाईफ फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,
उमंग ॲग्रो गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड, श्री लक्ष्मी नरसिंह स्पयनिंग प्रायव्हेट लिमिटेड, श्रीकांत ॲग्रोटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, हायक्यू व्हेनच्युअरस प्रायव्हेट लिमिटेड या ६ खाजगी कंपन्या पैकी ५ त्यांच्या पत्नी अनुराधा नागवडे यांच्या नावे तर एक कंपनी राजेंद्र नागवडे यांच्या नावावर असून
असल्याचे शेलार यांनी सांगत राजेंद्र नागवडे नागवडे सहकारी साखर कारखान्याच राजीनामा देणार का? असा सवाल अण्णासाहेब शेलार
यांनी उपस्थित केला.राज्यात नावाजलेल्या सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकार साखर कारखान्यात अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी स्वत:च्या दोन्ही मुलांच्या तसेच नातेवाईक आणि कर्मचारी
यांच्या नावाने शेत जमीन नसताना, उसाची नोंद नसताना देखील, बोगस ऊसाच्या नोंदी दाखून कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव मगर यांनी लेखी पुरवे देत पत्रकार परिषदेत केला.
येथील कुकडी शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की नागवडे यांनी रॉ शुगर तसेच व्हाईट त्यांच्या दोन्ही मुलांच्या नावे कोणत्याही
प्रकारची शेत जमीन नसताना शेकडो टन उसाचे लाखो रुपयांचे बोगस बील कारखान्यातून काढत इतर नातेवाईक आणि कर्मच्याच्याही नावे बोगस ऊस दाखऊन कोट्यवधीची बिले काढून सभासद शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे.