अहमदनगर बातम्या

Ahmednagar Pune Railway : अहमदनगर पुणे रेल्वे लवकरच सुरू होणार – खा सुजय विखे

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar Pune Railway : नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे बाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, रेल्वेतील उच्चस्तरीय प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. लवकरच नगर-पुणे इंटरसिटी धावू लागेल. सकाळी नगरहून पुण्यास आणि सायंकाळी पुण्याहून नगर अशी फेरी या इंटरसिटी रेल्वेची असेल,

अशी माहिती खा. डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र, सुरु होणारी हौ रेल्वे निरंतर सुरु राहण्याची जबाबदारी प्रवाशी नागरिकांची असेल, असेही त्यांनी ‘ठामपणे नमूद केले. दरम्यान, खा. विखे यांच्या भूमिकेमुळे नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेबाबत नगरकरांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

खा. डॉ.सुजय विखे पाटील यांची लोकसभेच्या विविध सत्रात सक्रिय सहभाग घेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल देशभारातील टॉप टेन खासदारात नोंद झाली. या यशाबद्दल जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने खा. विखे पाटील यांचा सत्कार शनिवारी त्यांच्या नगर शहरातील निवासस्थानी करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना खा. विखे यांनी जिल्ह्यातील विविध विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधला. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राच्या सध्यस्थितीबाबत त्यांनी रोखठोक मत मांडले. जिल्ह्याच्या विकास कामांचा आढावाही त्यांनी सादर केला. यावेळी राजकीय भाष्य करण्यात त्यांनी टाळले,

खा. विखे पाटील म्हणाले, निळवंडे प्रकल्प, नगर शहरातील उड्डणपूल, बाह्वयळण रस्ता, नगर-करमाळा, नगर पाथर्डी, काष्टी-आढळगाव, आढळगाव- जामखेड आदी कामे पाठपुरावा करून मार्गी लावण्यात यश आले. राष्ट्रीय वयोश्री सारख्या केंद्र सरकारने सुरु केलेल्या योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करीत लोकांपर्यंत लाभ पोहचविल्याचे समाधान आहे. नगर तालुक्‍यातील साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु आहे. कायदा व सुव्ववस्थेबाबत पोलिस दलाने योग्य ती भूमिका बजावावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, देशातील टॉप टेन लोकसभा सदस्य अर्थात खासदारात समावेश होणे हि खा. विखे पाटील यांच्या अभ्यासू कार्यशैलीवर उमटलेली मान्यतेची मोहोर आहे. देशातील एका मान्यताप्राप्त माध्यम समूहाने याबाबत परीक्षण, निरीक्षणाअंती खासदारांच्या कामकाजाचे मूल्यांकन करीत टॉप १० खासदारांची सूची बनविली. यात खा. विखे यांचा समावेश आहे.

सध्या १७ व्या लोकसभेचा पंचवार्षिक कार्यकाळ सुरु आहे. १७ व्या लोकसभेतील ५४५ खासदारापैकी २७० खासदार पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत.यापैकी १० खासदारांनी सभागृहाच्या कामकाजात सक्रिय सहभाग घेत उत्कषठ कामगिरी केली.

या टॉप १० मध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे खा.डॉ.सुजय विखे पाटील याचं समावेश आहे. विखे यांनी लोकसभेच्या ११ सत्रांमध्ये, सात खासगी विधेयकांच्या चर्चेत सक्रिय सहभाग घेतला असून, काही मुद्दयांवर हस्तक्षेप करत जनतेप्रति आपली भूमिका मांडली.

Ahmednagarlive24 Office