अहमदनगर बातम्या

Ahmednagar Rain News today : चोवीस तासांत जिल्ह्यात पावसाची ‘इतकी’ नोंद !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :-   नगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी काहीसा कमी झाला होता. दरम्यान गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत ५६६ पाऊस झाला.

यंदा सरासरीपेक्षा जिल्ह्यात अधिक पावसाची नोंद झाली. नगर शहर व जिल्ह्यात सोमवारी, मंगळवारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. बुधवारी मात्र पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला.

दोन दिवसात झालेल्या पावसामुळे विहिरी, तलावे, नदी नाले ओसंडून वाहू लागली आहेत. मुळा भंडारदरा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच असून दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे विहिरी भरल्या आहेत.

गोदावरीतून जायकवाडीकडे ६६ हजार २४ क्यूसेकने विसर्ग पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून धरणातील पाण्याची पातळी वाढली.

बुधवारी सायंकाळी नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत ३५ हजार ६१७ क्यूसेक, भीमा नदीत ३ हजार ५६४ क्यूसेसने पाणी सोडण्यात आले.

भंडारदरा धरणातून ३ हजार २५२ क्यूसेक, मुळा धरणातून ३ हजार २५५ क्यूसेक, सीना धरणातून २०२ क्यूसेक व गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीसाठी ६६ हजार २४ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Ahmednagarlive24 Office