अहमदनगर शिवसेनेकडून विकासाचे राजकारण करण्याऐवजी नामांतराचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल

Ahmednagar News:अहमदनगर शहरामध्ये महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या विद्यमान महापौर रोहिणीताई शेंडगे कार्य करत आहे.

सध्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रश्न प्रलंबित असून नगर शहराचा अनेक वर्षापासूनचा विकास खुंटलेला दिसत आहे. त्यातच नुकत्याच पूर्ण झालेल्या उड्डाणपूलाचे बांधकामानंतर श्रेय नामावली घेण्यासाठी सर्वांची चळवळ चालू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पण नागरिकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही मनपाचे पदाधिकारी संपूर्णपणे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. नुकतेच शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्याकडून उड्डाण पुलावर औरंगाबाद असे नमूद केलेले फलक काढून तेथे संभाजीनगर असे नमूद करण्याबाबत एक पत्रक काढण्यात आले आहेत.

वास्तविक नामांतर करण्यास कोणताही विरोध नाही तथापि अशा प्रश्नांमध्ये लक्ष घालून विकासाची कामे बाजूला ठेवण्यात येत असुन तरी शहरातील संपूर्ण रस्त्यावर झालेले खड्ड्याचे व पाणीपुरवठा योजना रखडल्याचे तसेच वीज दिव्यापासून कोणत्याही विकासाचे प्रश्न मार्गी न लावता अशा नामांतरांच्या बाबीकडे लक्ष वेधून त्याद्वारे जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे.

त्यामुळे विनाकारण नागरिकांमध्ये रोष निर्माण होत असुन शिवसेनेकडून नामांतराबरोबरच विकास कामे केल्यास त्यास सर्वांचा पाठिंबा असेल तथापि विकास कामाबाबत मात्र त्यांच्याकडून कोणतीही कामे करण्यात येत नाही व अशा भावनिक प्रश्नाचे राजकारण करण्यात येत असून शिवसेनेकडून विकास कामे झाल्यास त्याला एमआयएम पार्टीकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात येईल तरी शिवसेनेकडून विकास कामाचे राजकारण व्हावे असे आव्हान एमआयएमचे कार्याध्यक्ष मतीन शेख यांनी केले आहे