अहमदनगर दक्षिण

मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवत 27 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2021 :-  युवकाने विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथे घडली आहे. गोविंद सटाले (वय 27 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

या घटनेने निमगाव गांगर्डामध्ये शोककळा पसरली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, दरम्यान गोविंद हा नगर येथे नोकरी करत होता.

त्याने आपल्या मालकास मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली. त्यामध्ये घरच्या व्यक्तीचे मोबाईल क्रमांक तसेच आत्महत्या करणार असल्याचे ठिकाण लिहिले होते.

दिलेल्या क्रमांकावर नातेवाईकांना संपर्क करण्यास सांगून गोविंदने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक रवींद्र वाघ, वैभव सुपेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

सदर तरुणाचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर निमगाव गांगर्डा येथे शोकाकूल वातावरणात गोविंदच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office