वीज चोरी करणे पडले महागात ‘त्या’ ऍक्वा कंपनीच्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  वीज मिटरमध्ये फेरफार करत सुमारे ४७ हजार ४९० रुपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी नगरमधील दोघा जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कंपनीच्या विशेष भरारी पथकाचे प्रमुख अभियंता प्रदीप सावंत यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी, शहरातील बाबा बंगाली परिसरात असलेल्या रियल जॅम ऍक्वा वॉटर येथे महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकला असता तेथे जागेचे मालक पी. पी. गांधी व वापरकर्ते रफिक खुदाबक्ष सय्यद यांनी वीज मिटरमध्ये फेरफार करत सुमारे वर्षभरापासून वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले होते.

या कालावधीत महावितरणची एकूण ३ हजार ४८८ युनिट विजेची चोरी करण्यात आली असून, तिची अधिभारासह किंमत ४७ हजार ४९० एवढी होते.

तसेच तडजोडीची रक्कम १० हजार या आरोपींना ७ दिवसात भरण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी वीज चोरीची व दंडाची रक्कम न भरल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.