अहमदनगर दक्षिण

बेंचवर बसण्याच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

कॉलेजमध्ये बेंचवर बसण्याच्या वादातून एका विद्यार्थ्याला बागेत नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आलाय.

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाण करणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर दोन जण फरार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, मारहाण करण्यात आलेला तरुण घुगल वडगाव येथील रहिवासी असून श्रीगोंदा शहरातील एका महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकतो.

या युवकाचा बेंचवर बसण्याच्या किरकोळ कारणावरून वर्गातल्या इतर दोन विद्यार्थ्यांशी वाद झाला होता. सदर वाद आपापसात मिटलाही होता.

मात्र कॉलेज सुटल्यानंतर सिद्धार्थनगर येथील दोन युवक आले आणि सदर युवकाला बागेत घेऊन जाऊन त्याला बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office