अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली एक लाख 30 हजार रूपयांची रोख रक्कम, तीन बँकांचे चेकबुक असा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला.
याप्रकरणी वैभव नवनाथ सुरवसे (वय 43 रा. अभियंता कॉलनी, औरंगाबाद रोड, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागापूर एमआयडीसीतील आयटीआय कॉलेज समोरील कॅन्टींगसमोर घडला. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी (एमएच 16 बीजी 3663) आयटीआय कॉलेजसमोरील कॅन्टींगसमोर उभी केली होती.
दुचाकीच्या डिक्कती एक लाख 30 हजार रूपयांची रक्कम व स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा व महाराष्ट्र बँकेचे चेकबुक होते.
हा सर्व ऐवज चोरट्याने लंपास केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक फौजदार गायकवाड करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम