अहमदनगर दक्षिण

नवीन नियमानुसार ‘या’ तालुक्यातील नगरसेवकांची संख्या वाढणार…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- शासनाच्या नवीन नियमानुसार जामखेड नगर परिषद निवडणूकीत २१ ऐवजी १२ प्रभाग तर २१ ऐवजी ३ जाग वाढून २४ नगरसेवक निवडले जाणार आहे.

वाढत्या संख्येमुळे आता इच्छुक उमेदवारांची संख्याही वाढली आहे. दरम्यान नगर परिषद निवडणुकीबाबत शहराच्या लोकसंख्येच्या आधारावर नगरपालिकांची सदस्यसंख्या वाढवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जामखेड नगरपरिषदेने यापूर्वी असलेल्या प्रभाग रचनेत बदल करून १२ प्रभागातून नगरसेवक पदाच्या २४ जागा निश्चित केल्या असून याबाबत संख्या व प्रभाग रचना निश्चितीचा प्रस्ताव मंजुरीसाठी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे.

नवीन प्रस्तावानुसार या पंचवार्षिक निवडणुकीत ३ नगरसेवक सदस्य संख्या वाढणार आहे. जामखेड नगरपरिषदेची मुदत ७ फेब्रुवारी २०२० रोजी संपुष्टात आली आहे.

सद्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणूक पूर्व कार्यक्रम जाहीर केला होता. दरम्यान कोरोनामुळे २०२१ ची जनगणना रखडली आहे.

त्यामुळे राज्य शासनाने चार ते पाच टक्के लोकसंख्या वाढ गृहीत धरून नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार विभागीय आयुक्तांना सदस्यसंख्या निश्चितीचे अधिकार दिले आहेत. सरकारच्या निर्देशानुसार वाढलेली लोकसंख्या गृहीत धरुन २४ जागांचा प्रस्ताव मंजुरी करिता नगरपरिषदेने पाठवला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office