अहमदनगर दक्षिण

अहमदनगर ब्रेकिंग : वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढल्याने खळबळ !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2021 :-   राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर गुंजाळ नाका परिसरात सोळुंकी यांच्या पेट्रोल पंपासमोरील मळीच्या गटारात गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.

नगर-मनमाड मार्गावरून एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना लघुशंकेसाठी थांबले असता मळीच्या गटारात एक वयोवृद्ध महिलेचा मृतदेह दिसून आला.

त्यांनी तातडीने सदर माहिती स्थानिक नगरसेवक आदिनाथ कराळे यांना दिली. कराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेहाबाबत माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक नीरजकुमार बोकील पोलीस हॅडकॉन्स्टेबल डी. एन.गर्जे यांनी दाखल मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी साई प्रतिष्ठनचे रुग्णवाहिका चालक रवी देवगिरे यांच्या मदतीने नेण्यात आला आहे.,

सदर महिला वेडसर असल्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी जोराची धडक दिल्याने मृत्यू झाला असल्याचे बोलले जात आहे. घटनेचा आधिक तपास पोलीस करीत आहे.

Ahmednagarlive24 Office