Ahmednagar Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे.
भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात रूपाली चाकणकर यांना धमकीचा फोन आला होता.
पुढच्या २४ तासांत रुपाली चाकणकर यांना जीवे मारु, असा हा धमकीचा फोन होता. अहमदनगरमधील व्यक्तीने फोन केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली.
आज सकाळी सहायक निरीक्षक सानप व त्यांच्या पथकाने चिंचोडी पाटील गावातून शिंदे याला ताब्यात घेतले आहे. अटकेची कारवाई सुरू असून दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.