Ahmednagar News : १७ वर्षीय मुलीचे अपहरण , पोलिसात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :- राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथून एका १७ वर्षीय मुलीचे तिच्या राहत्या घरातून अपहरण करून पळवून नेल्याची घटना सुमारे दिड महिन्यापूर्वी घडलीय.

मुलीचा शोध घेऊन ती सापडत नसल्याने काल दिनांक १० फेब्रुवारी रोजी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी तालूक्यातील अनापवाडी येथे सदर १७ वर्षीय मुलगी ही तिच्या आई वडिलां सोबत राहते.

दिनांक १२ डिसेंबर रोजी रात्री नऊ ते पहाटे चार वाजे दरम्यान सदर मुलीला तिच्या राहत्या घरातून तिच्या आई वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात इसमाने तिला पळवून नेले.

सकाळी उठल्यानंतर घरातील लोकांना ती मुलगी दिसली नाही. त्यांनी इतरत्र तिचा शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. अखेर दिनांक १० फेब्रुवारी रोजी त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

घडलेला सर्व प्रकार पोलिस अधिकाऱ्यां समक्ष कथन केला. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात इसमा विरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शन पोलिस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.