अहमदनगर लाईव्ह 24 टीम / जामखेड :- तालुक्यातील अनेक भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.अनेक भागात भुरट्या चोऱ्यांसह मोटारसायकल चोऱ्यात देखील प्रमाणात वाढ झाली आहे.
खर्डा सोनेगाव रोडवरील शिंदे वस्ती येथे शेळ्या चोरी करत असताना झालेल्या झटापटीत भगवान विश्वनाथ शिंदे वय ६५वर्षे यांच्यावर दगडाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मारहाण प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की, दि.१४ रोजी रात्री शिंदे वस्तीवरील भगवान शिंदे हे शेळ्या ओरडल्याच्या आवाज ऐकू आल्यामुळे जागे झाले. या दरम्याना एकजण शेळ्या चोरून नेत असताना शिंदे यांनी पाहीले व त्या चोरट्याला अडवत मोठ्याने ओरडल्यानेचोराला शेळ्या सोडून द्याव्या लागल्या.
मात्र याचा चोरट्याला रोग आल्याने चोरट्यांनी दगडाने केलेल्या मारहाणीत भगवान शिंदे यांच्या उजव्या डोळ्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.त्यावेळी मोठा आरडाओरड झाल्याने शेजारी रहिवासी आल्याने चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.
त्यामुळे चोरट्यांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. जखमी भगवान शिंदे यांच्यावर खर्डा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.