अहमदनगर : आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून नगर शहराला मिळाला दीडशे कोटीचा निधी, ‘या’ महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात

Tejas B Shelar
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे शहरातील माऊली संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि आप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंतचा रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा होणार आहे. विशेष बाब म्हणजे या रस्त्याचे भूमिपूजन आमदार जगताप यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले असून या रोडचे प्रत्यक्षात काम देखील सुरु करण्यात आले आहे. खरं तर आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून गेल्या पाच वर्षांच्या काळात नगर शहरातील अनेक महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.

जगताप हे आमदारकीचा कारभार स्वीकारल्यानंतर लगेचच ॲक्शन मोड मध्ये आले होते आणि त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित विकास कामे या पाच वर्षांच्या काळात पूर्ण केली आहेत. शहरातील बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे काम देखील आमदार जगताप यांच्या पुढाकाराने पूर्ण झाले आहे.

दरम्यान आता माऊली संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे कापड बाजार पर्यंतच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. या कामाचा शुभारंभ नुकताच झाला असून कोणताही गाजावाजा न करता जगताप यांनी शहराच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे.

या मंजूर झालेल्या निधीमधून शहरातील विविध भागातील विकास कामांना आता वेग आला आहे. जगताप यांच्या प्रयत्नातून शहराला दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला असून यातून शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन झाले असल्याने येत्या काळात नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

विशेष म्हणजे भूमिपूजनानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की अहमदनगर शहर आणि सावेडी उपनगर यांना जोडणारा रस्ता म्हणजे अप्पू हत्ती चौक ते सर्जेपुरा मार्गे तेली खुंट आणि कापड बाजार हा रस्ता खूपच खराब झाला होता. या रस्त्यावरून प्रवास करणे खूपच आव्हानात्मक बनले होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते.

रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता हेच समजत नव्हते. यामुळे या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याची झालेली ही दुरावस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होते. रस्त्याची झालेली चाळण म्हणजेच अपघाताला निमंत्रण होते. मध्यंतरी महानगरपालिकेच्या माध्यमातून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती.

हा रस्ता दुरुस्त करून प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला होता. मात्र हा प्रयत्नही फसला. महानगरपालिकेच्या प्रयत्नांमुळे रस्ता आणखी खराब झाला. हेच कारण होते की हा रस्ता नव्याने तयार झाला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित केली जात होती. दरम्यान आता नागरिकांची ही मागणी पूर्ण होणार आहे.

आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने नगर शहराला मिळालेल्या दीडशे कोटी रुपयांच्या निधीमधून आता या रस्त्याचे काम केले जाणार आहे. हा रस्ता आता सिमेंट काँक्रेटचा बनणार असल्याने येथील नागरिकांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे.

या कामाचा आमदार जगताप यांच्या हस्ते शुभारंभ झाला असून लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रेटचा बनून तयार होणार आहे. यामुळे शहरातील नागरिकांची मोठी मागणी पूर्ण होणार असून जगताप यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे बोलले जात आहे. जगताप यांनी आमदारकीचा कारभार स्वीकारल्यानंतर खूपच उत्तम काम केले आहे.

त्यांनी नगर शहराचा एकात्मिक विकास सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला आहे. जगताप हे शहरवासियांना दिलेले आश्वासन पूर्ण करत असून त्यांच्या या कामगिरीची अनेकांना भुरळ पडली आहे. शहरातील नागरिकांच्या माध्यमातून जगताप यांच्या कामाची प्रशंसा केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe