Ahmednagar Zp Elections : गट-गण रचनेत सोयीस्कर गावांसाठी नेते पोहोचले मुंबईला..

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :- नगर तालुक्यात आता जिल्हा परिषद गटांची संख्या ७ होणार आहे. जुन्या जेऊर, दरेवाडी, नागरदेवळे, निंबळक, वाळकी, देहरे या सहा गटात आता अरणगाव या नव्या गटाची भर पडणार आहे.

नवीन एक गट तयार करताना जुन्या गटात अनेक फेरबदल होत आहेत. पण होणारा फेरबदल निवडणुकीच्या दृष्टीने लाभदायक की धोकादायक यानुसार नेत्यांनी सोयीस्कर गट रचनेसाठी दबाव तंत्राचा वापर सुरू केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यासाठी जेवढी शक्ती पणाला लावता येईल, तेवढी लावत मुंबईपर्यंत लॉबिंग केले गेले आहे. या लॉबिंग मुळेच तहसीलदार मुंबईत दाखल झाले आहेत.

नगर तालुक्यात वाढीव एक जिल्हा परिषद गटाची निर्मिती करण्याबाबतच्या आणि त्याचा कच्चा आराखडा तयार करून जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले होते.

महसूल आणि निवडणूक शाखा गोपनीय पद्धतीने काम करत असतानाच राजकीय नेत्यांचे रचनेवर बारकाईने लक्ष होते. मिळेल तेथून माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

तालुक्यात एक गट वाढत असताना पूर्वीच्या सहा गटांत काही प्रमाणात बदल होणार हे जगजाहीर होते. पण होणारा बदल हा फायद्याचा असावा तोट्याचा नव्हे, यासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते आणि इच्छुक देव पाण्यात मांडून बसले आहेत.

त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येकाने वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या ऋणानुबंधाचा फायदा आपल्या गट- गण रचनेत कसा होईल, याचा जास्तीत जास्त प्रयत्न चालवला आहे.

संभाव्य विरोधक कोण असेल, हे माहीत असल्यामुळे गट-गण रचनेतच त्याला कशी मात देता येईल आणि त्याची ताकद कशी कमी होईल, याकडे पण जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे.

कोणते गाव आले-गेले, तर सोइस्कर राहील, याची राजकीय गणिते मांडत दबावतंत्राचा जास्तीत जास्त वापर अधिकाऱ्यांवर सुरू आहे