अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- वडापाव खाल्ल्याचे पैसे मागितल्याचा कारणावरून दोघांनी हॉटेल मालकावर थेट चाकूहल्ला केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे घडली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ahmednagar Crime)
या प्रकरणी सविस्तर मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील ढोरजा येथे प्रवीण झुंबर पारधे याचे हॉटेल आहे. काल दुपारच्या सुमारास सचिन ज्ञानदेव धोत्रे आणि गोट्या ज्ञानदेव धोत्रे यांनी वडापाव खाल्ला.
त्यानंतर त्याचे पारधे याने पैसे मागितल्याचा राग येऊन दोघांनी प्रवीण याला जातीवाचक शिवीगाळ करत तुझ्याकडे पाहतो असे म्हणून निघून गेले.
मात्र सचिन ज्ञानदेव धोत्रे, ज्ञानदेव नामदेव धोत्रे आणि सागर सुरेश बोटे यांनी पुन्हा हॉटेलवर येऊन तू कशाचे पैसे मागतो, असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ करून प्रवीण याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत गालावर दंडावर चाकूने वार केला.
दरम्यान प्रवीण याचा भाऊ बबन भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याच्या देखील दंडावर तसेच डोक्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले.या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.