अहमदनगर दक्षिण

मोकाट कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर हल्ले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण परिसरातील मोकाट कुत्र्यांचे पाळीव जनावरांवर होणारे हल्ले शेतकऱ्यांच्या दृष्टीने चिंताजनक ठरले असून

लहान मुलांवर हल्ला होण्याची भीती गावकऱ्यांत असल्याने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

मुळा धरणाच्या लगत असलेल्या शेरी चिखलठाण परिसरात मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला आहे. या भागातील नामदेव गायकवाड यांच्या शेळीवर कुत्र्यांनी हल्ला चढवून शेळीला ठार मारले.

संतोष काळनर यांच्या गायीवर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले. मोकाट कुत्र्यांकडून पाळीव जनावरांवर होणारे हल्ले पाहता शेतकरी धास्तावले आहेत.

या भागात मोकाट कुत्रे आणून सोडल्याचे गावकऱ्यांनी म्हटले असून या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. मोकाट कुत्र्यांच्या त्रासामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले.

Ahmednagarlive24 Office