Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- अनुराधा नागवडे यांची कारखाना निवडणुकीत फरफट होत आहे. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाचपुते कुटुंबावर टीका केली.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सगळ्यांवर आमचे उपकार आहेत, असे नागवडे म्हणाल्या. उपकाराची भाषा आणि दरबारी राजकारण यामुळेच अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे श्रीगोंद्याचे कधीच आमदार झाले नाही.

सामान्य माणसांची ज्यांना फक्त निवडणुकीतच आठवण येते त्यांनी पाचपुतेंची उंची मोजू नये, असे प्रत्युत्तर डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी अनुराधा नागवडे यांना दिले आहे.

अनुराधा नागवडे यांनी प्रतिभा पाचपुते यांच्यावर टीका केली होती. त्यावर सोमवारी पाचपुते यांनी पत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, बबनराव पाचपुते यांना तालुक्यातील जनतेने भरभरून दिले.

त्याची उतराई कधीच होऊ शकत नाही. यामुळे आम्ही कुटुंबीय निवडणुका असो किंवा नसो जनतेत असतो. त्यांचे सुख दुःख वाटून घेतो. नागवडे कधी रस्त्यावर, गरीब कार्यकर्त्यांच्या घरी दिसले का?

त्यांना सोधा पक्षात जास्त रस आहे. आमचे सर्वांवर उपकार असल्याची भाषा नागवडे करतात. श्रीमंतीचा गर्व असल्यानेच ते ग्राउंड लेव्हल पासून लांब आहेत. नागवडे यांचा हेकेखोरपणा त्यांच्या राजकीय प्रगतीला अडचणीचा ठरत आहे.

डोईजड होणाऱ्या माणसांचे खच्चीकरण करणे हा नागवडे यांचा स्थायीभाव आहे. हा स्वभाव नागवडे यांना आमदारकीपासून वंचित ठेवण्यास कारणीभूत आहे. पाचपुते कुटुंबीयांनी तालुक्यात नेते निर्माण केले त्यांना ताकद दिली.

एवढी उदारता नागवडेंनी एकदाही दाखवली नाही. त्यांच्याकडून तालुक्याला अपेक्षा देखील नाहीत. पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी, असेही पाचपुते म्हणाल्या.