अहमदनगर दक्षिण

भरधाव कारची दुचाकीला धडक ; चुलत्याचा मृत्यू तर पुतण्या गंभीर जखमी नगर – पुणे महामार्गावरील घटना…

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- भरधाव वेगात असलेल्या कारने दुचाकीस पाठिमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चुलत्याचा मृत्यू तर पुतण्याला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

ही घटना पारनेर तालुक्यातील सुपा येथे नगर – पुणे महामार्गावर हॉटेल मातोश्रीच्या अलीकडील वळणावर झाला. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शशिकांत गवळी व त्यांचा पुतण्या अजित गवळी (रा. शहाजापूर ता. पारनेर) हे पुणे -नगर महामार्गावरून (एमएच १६ एएस ६०४०) या मोटारसायकलवरून सुप्याच्या दिशेने जात होते.

या वेळी पुण्याकडून आलेल्या (एमएच १२ केई ३०४६) या भरधाव वेगातील कारने गवळी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात शशिकांत किसन गवळी यांचा जागीच मृत्यू झाला तर मोटारसायकल चालवत असलेला पुतण्या अजित प्रमोद गवळी हा गंभीर जखमी झाला आहे.

त्याला उपचासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे.शशिकांत गवळी यांचा मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

याप्रकरणी सुपा पोलिसांनी कारचालक बाबासाहेब छबू माने ( रा. मुळानगर, राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Ahmednagarlive24 Office