अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2022 :- कर्जत तालुक्यातील राक्षेवाडी परिसरात मद्य वाहतुक करणार्या टॅम्पोवर पोलीस पथकाने धडक कारवाई करून सुमारे 34 लाख 67 हजार रुपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे.
या कारवाईत एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक माहिती अशी, कर्जत – श्रीगोंदा रस्त्यावर एक आयशर टेम्पो विदेशी दारूची वाहतूक करणार असल्याची गुप्त माहिती जाधव यांना मिळाली होती, त्यांनी पोलीस पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. कर्जत- श्रीगोंदा रस्त्यावर गस्त करीत असताना
राक्षसवाडी गावच्या शिवारात एक टेम्पो मिळून आला. गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये मागील बाजूस कोंबड्यांचे खताच्या गोण्या व मागील बाजूस विदेशी दारूचे खोके आढळून आले.
याप्रकरणी पोलिसांनी गीताराम आनंदा लंके रा. निघोज ता. पारनेर) यास ताब्यात घेतले आहे. तसेच दारूचे बॉक्स प्रकाश शेळके (रा. निघोज ता. पारनेर) यांच्या घरी घेऊन चाललो असल्याचे संबंधिताने सांगितले.
यात एकूण 370 विदेशी दारूचे खोके जप्त करण्यात आले. आयशर टेम्पोसह 34 लाख 67 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.