अहमदनगर दक्षिण

ऊसतोड मजुरांचे धान्य पळवणारे ‘बंटी बबली’ जेरबंद..!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 03 फेब्रुवारी 2022 :-  परजिल्ह्यातून कर्जत तालुक्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कोप्यांची कुलुपे तोडून त्यांचे धान्य चोरणाऱ्या ‘बंटी-बबलीला’ कर्जत पोलिसांनी जेरबंद करत त्यांच्या अन्य दोन साथीदारांवरही गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, कर्जत तालुक्यातील येसवडी येथे ऊसतोडणीसाठी आलेल्या आप्पा धनंजय भिल्ल या मजुराच्या कोपीचे कुलूप तोडून कोपीतील १०० किलो बाजरी इंडिका (एम.एच ४२ ए.१४११) मध्ये भरून घेऊन जात असताना पोलिसांनी अमोल रमेश सुलताने व गिता अमोल सुलताने या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांचे साथीदार सुनिल सुभाष बर्डे, अनिल ऊर्फ भिमराज निकम आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आरोपींना कर्जत न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी रिमांड घेवुन अधिक तपास केला असता अमोल सुलताने व अनिल ऊर्फ भिमराज निकम यांनी कर्जत तालुक्यातील गणेशवाडी येथून शेळ्या चोरल्याची देखिल कबुली दिल्याने तसा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत.

Ahmednagarlive24 Office