अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- सध्या साखर कारखान्यांचे गळित हंगाम सुरू असल्याने उसाचे ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. परंतू अनेक ठिकाणी रस्त्यावरील चढ- उतार, खड्डे, गतिरोधक, अशा ठिकाणी या ट्रॅक्टर चालकांची कसरत होत आहे.
त्यातून एखादी दुर्घटना होण्याअगोदर उपाययोजना करण्याची गरज आहे. उसाचे ट्रॅक्टर चढावर असताना ट्रॉलीला पाठीमागून मोठ्या दगडाची उटी लावतात व ट्रॅक्टर पुढे गेला की रस्त्यावर तो दगड तसाच राहतो.
रस्त्यावरील अशा दगडांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकताच कर्जत तालुक्यातील एक ट्रॅक्टरचालक रस्त्यावर दगड तसाच ठेवून पुढे निघून गेला.
या ट्रॅक्टरचालकाचा यादव यांनी पाठलाग करून त्याला जोगेश्वरवाडीये येथे पकडले व त्याला पुन्हा असे न करण्याबाबत सूचना केली.
याबाबत त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, अशा प्रकारे उसाची वाहतूक करणारे चालक व त्यांचे मालक यांनी ना याबाबत काळजी घ्यावी अन्यथा अशा लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.