अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील कमालीची भीती पसरू लागली आहे. बिबट्याचा दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहे.
नुकतेच बिबट्याने पारनेर तालुक्यात दर्शन दिल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. पारनेर तालुक्यातील अस्तगाव शिवारात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत असून गावकर्यांमध्ये दहशत पसरली आहे.
वन विभागाने पिंजरा लावून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रांमस्थाच्या वतीने करण्यात आली आहे. 10 नोव्हेंबरपासून वाडीवस्ती आस्तगाव येथे रोज बिबट्याचे दर्शन होत आहे.
शेतकरी रात्री शेतावर पाणी भरण्यासाठी थांबतात तर शेतीच्या कामानिमित्ताने महिला वर्गही उशिरापर्यंत शेतावरच असतात. अशातच गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण पसरले असून बिबट्यामुळे शेताला पाणी देणेसह इतरही कामे खोळंबली आहेत.
तर महिला मुले यांना घराबाहेर निघणे आवघड झाले आहे. तेव्हा वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थाची मागणी आहे .
दरम्यान यापूर्वीही बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.