अहमदनगर :- कल्याण रोड चौकातून एमआयडीसी बायपासने जात असलेल्या ट्रकचालकास दोघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले.
याप्रकरणी ट्रकचालक किसन महादेव देसाई (रा. साबलखेड, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नालेगाव शिवारातील रेल्वे ब्रिजजवळ ट्रक आला असता पाठीमागून दोन दुचाकीवर आलेल्या चौघांनी ट्रक थांबवून ट्रकचालकास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन तोळ्यांची सोन्याची चैन, तसेच १२ हजार रुपये रोख असा सुमारे ३७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.