Ahmednagar News : आजही जिल्ह्यातील अनेक भागातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे शेवगांव तालुक्यातील देवटाकळी येथे नुकताच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे.
यात अनेक ठिकाणी छोटी मोठी झाडे उन्मळून पडली तर वादळी वाऱ्याने गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेले.सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
जोरदार वारे व पावसाने अनेक ठिकाणी वाढलेले उसाचे पिक आडवे झाले आहे. या वादळी वाऱ्याने गावातील खरड यांच्या घराची पत्रे उडून १०० फुटावर जाऊन पडले.
यात एकजण किरकोळ जखमी झाला आहे. एका नवीन सुरू असलेल्या बांधकामाची भिंत कोसळून नुकसान झाले. वादळात किरकोळ प्रकार वगळता जनावरे नागरिक सुरक्षित राहिले,
मात्र ऊस पिकाचे मोठे प्रमाणात नुकसान झाले.ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पिके पाण्यावाचून आडवी पडली होती.
सप्टेंबर महिन्यात गणपती बरोबर आलेला पाऊस ठीक ठिकाणी बरसला आहे अनेक ठिकाणी होत असलेल्या पावसाने पिकाला जीवदान मिळाले तर अजून अनेक ठिकाणी पावसाची प्रतीक्षा आहे.