अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकून सदर परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावरील कच्चे रसायन,
1950 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू 125 लिटर असा एकूण 95,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. त्यानुसार सोमनाथ माधव बर्डे, इंदुबाई माळी (पूर्ण नाव माहीत नाही),
3 अज्ञात (फरार) सर्व राहणार देवळाली प्रवरा, तालुका राहुरी यांचेविरुध्द महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(फ) नुसार PC नितीन शिरसाठ नेमणूक उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय श्रीरामपूर यांचे फिर्यादीनुसार राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे. सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक,
अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, गणेश पाटील ,पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके,
डीवायएसपी नितेश शेंडे ( राज्य उत्पादन शुल्क), पोलीस निरीक्षक हुलगे, पोलीस निरीक्षक कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अहिरराव, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे व इतर अधिकारी व अंमलदार आदींनी केली.