पारनेर परिसर डोंगररांगांनी वेढलेला. आपल्या पारनेरमध्ये एकूण सात हेमाडपंथी देवालय आहेत. त्यातील सहा हेमाडपंथी शिवालय तर एक खंडोबाचे देवालय आहे.त्यापैकी एक म्हणजे सिद्धेश्वरवाडीतील सिद्धेश्वर!. बाराव्या तेराव्या शतकात महाराष्ट्र भूमी शिव अराधनेसाठी मोठी प्रसिद्ध होती.
इतकेच नव्हे तर अवघा तत्कालीन महाराष्ट्र शिव अराधनेला वाहिलेला होता की काय? अशी परिस्थिती यादवकालीन महाराष्ट्रामध्ये दिसून येत असे.शिव आराधना मोठ्या प्रमाणात त्याकाळी चाले.
आपल्या सिध्देश्वरांचं विविध ऋतूत सौंदर्य वेगळाच दिसतंय.पावसाळ्यात या डोंगर रांगा हिरवी शालू नेसून आपल्या स्वागताला तयार असतात. पारनेर शहराच्या पश्चिमेला डाव्या बाजूने एक रस्ता सिद्धेश्वरवाडीकडे जातो.
विविध ऋतूत सौंदर्य वेगळाच दिसतंय.पावसाळ्यात या डोंगर रांगा हिरवी शालू नेसून आपल्या स्वागताला तयार असतात. पारनेर शहराच्या पश्चिमेला डाव्या बाजूने एक रस्ता सिद्धेश्वरवाडीकडे जातो. वाटेत एक भली मोठी लोखंडी कमान दिसते.त्याकमानीतून पुढे प्रवास करत राहिल्यास गायरान लागतं.पुढे एक फाटा सिध्देश्वरवाडीकडे घेऊन जातो.
तर सरळ रस्त्याने पुढे गेल्यावर एका तीव्र उतारावर गाडी अचानक थांबते. तोपर्यंत इथे काही असल्याचे दिसत नाही.दोन ओहोळाच्या संगमावर एक शिवालय दिसते. पार्किंग पासून शिवालयापर्यंत रंगीबेरंगी सिमेंट ब्लॉकने सुंदर रस्ता तयार केला आहे. उजव्या बाजूकडील ओहोळावरती पूल टाकून मोठी सोय करण्यात आली आहे.
त्या पुलाच्या उजव्या बाजूला अठराव्या शतकात बांधल्या गेलेल्या धर्म शाळेच्या वास्तू दृष्टीस पडतात. 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात त्या धर्मशाळेचे बांधकाम झालेली दिसून येते. धर्मशाळेवरील खोल्यावर विटांचे बांधकाम पेशवाईतील बांधकामाशी साम्य सांगते. तिथं एक पुष्करणी दिसते. तिथे इतर काही वास्तू अवशेष आढळून येतात.
पुन्हा त्याच रस्त्याने पाठीमागे आल्यावर त्या पुलाजवळ पूर्वेकडून एक ओहोळ येऊन मिळतो ते दोन्ही मिळून दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत जातात. तो मोठा पाण्याचा प्रवाह खोल दरीत कोसळतो. त्यामुळे नैसर्गिक धबधबा निर्माण झालेला दिसतो. याच संगमावर उत्तर यादवकालीन काळामध्ये येथे एक शिवालय बांधण्यात आले.
त्यास सिद्धेश्वर असे संबोधण्यात आले. उत्तर यादवकालीन काळात बांधल्या गेलेल्या शिवालयाचे अवशेष या परिसरामध्ये आढळून येतात. तसेच पराशर ऋषींच्या आश्रमाचे ही अवशेष येथे आढळतात.पूर्वीच्या उत्तर यादवकालीन मंदिराच्या बांधकामाच्या अवशेष तेवढे थोडे फार शिल्लक आहेत.
जसे की स्तंभ, त्या मंदिराच्या बांधकामाची घडीव दगड, उत्तर यादवकालीन विविध मूर्ती, दगड वीरगळी, महादेवाच्या पिंडी,भग्न नंदी, पाराशर ऋषींच्या यज्ञाची जागा, सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे काही स्थाने,इतर अवशेष हे उत्तर यादवकालीन असल्याचे दिसून येते.
उत्तर यादवकालीन बांधकामाची शिल्पशैली,मंदिर निर्मितीची पद्धत-कन्स्ट्रक्शन मेथड, छत चे अवशेष यावरून पूर्वी इथं उत्तर यादवकालीन शिवालय होते. हे आपल्या लक्षात येते. उत्तर यादवकालीन मंदिराच्या पूर्वीही हा परिसर गजबजलेला आढळतोय. ज्या पराशर ऋषींच्या वास्तव्यामुळे या परिसराला पारनेर असे संबोधले ते पाराशर ऋषी किंवा त्यांच्या पुत्राच्या वास्तव्यामुळे या परिसराला पारनेर म्हटलं गेलंय. पाराशर ऋषींची तपोभूमी किंवा यज्ञ भूमी म्हणून ही डोंगरातली जागा वैदिक काळात घेऊन जाते.
सुप्रसिद्ध इतिहासकार ब्रिजेश श्रीवास्तव यांच्या अभ्यासानुसार इसवीसन पूर्व 1500 ते 1000 हा काळ वैदिक मानला जातो किंवा इतर तज्ज्ञांच्या मते इसवीसन पूर्व 1500 ते 600 हा वैदिक कालखंड सांगता येतो. याच काळात येथे पाराशर ऋषी किंवा त्यांचे पुत्र येथे आले असावेत. तेव्हापासून हा सिद्धेश्वर वाडीचा परिसर गजबजलेला दिसून येतो.
पुढे इसवी सनाच्या नवव्या शतकापासून अकराव्या शतका दरम्यान आपल्या जिल्ह्यात नाथपंथाचा उदय झालेला दिसून येतो वृद्धेश्वर किंवा आदिनाथ हे शिवालय नाथ संप्रदायाचे जन्मस्थळ मानले जाते. त्या नवनाथांपैकी किंवा 84 सिद्धां पैकी कुणीतरी एक जण या सिद्धेश्वराच्या प्राचीन स्थळावर भ्रमंती केली असली पाहिजे.
सध्याच्या सिद्धेश्वराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारासमोर असणाऱ्या मोठ्या नंदीच्या आयाळीमध्ये नारद उभा असलेला दिसून येतो. त्यामुळे ही नाथ संप्रदायाचं भ्रमंती स्थळ असले पाहिजे असा तर्क लावता येतो. तो तर निश्चितच सत्याच्या जवळ जाणारा आहे. 18 व्या शतकामध्ये उत्तर यादवकालीन मंदिरांचे अवशेष, मंदिराची रचना, परिसरातील वस्तू आणि वास्तू, येथील प्राचीन परंपरा आणि वारसा लक्षात घ…