अहमदनगर दक्षिण

दारूच्या नशेत सुसाट वेगाने दुचाकी चालविणाऱ्या चालकाचा अपघातात मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा ते मांडवगणकडे जाणार्‍या मोटारसायकलने दुभाजकावरील लाईटच्या पोलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलस्वार ऋतिक पवार (वय 19, राहणार भिगवण, तालुका श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला.

याबाबतची माहिती अशी की ऋतिक इकबाल पवार हा दारू पिऊन त्याची मोटारसायकलवरून श्रीगोंदा येथून मांडवगणकडे जात होता.

यावेळी मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यामधील दुभाजकाच्या लाईटच्या पोलला पवार याची दुचाकीची जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर त्यास उपचारकरिता तातडीने रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी विठ्ठल बडे यांच्या फिर्यादीवरून अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली.

Ahmednagarlive24 Office