अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- शेतजमीन परस्पर नावावर करून घेतली, याचा राग मनात धरून एका तरुणाला आठ जणांनी लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण बेदम करून जखमी केले.
ही घटना राहुरी तालुक्यातील मुसळवाडी शिवारात घडली.पंकज राजुळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास फिर्यादी पंकज हा मुसळवाडी शिवारातील त्याच्या शेतात होता.
त्यावेळी आरोपी गैर कायद्याची मंडळी जमा करून पंकज याच्या शेतात गेले. तेव्हा पंकज याला शेतजमीन आमच्या परस्पर नावावर करून का घेतली, याचा राग मनात धरून आरोपींनी लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण करून जखमी केले आणि शिवीगाळ केली.
तसेच घरातील लोकांना जिवे मारुन टाकण्याची धमकी दिली. या मारहाणीत पंकज याच्या खिशातील मोबाईल व पैसे गहाळ झाले आहेत.
त्याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आरोपी कचरू लक्ष्मण माळवदे, सतिष बाबासाहेब माळवदे, आण्णासाहेब लक्ष्मण माळवदे, पोपट कचरू माळवदे, सविता आण्णासाहेब माळवदे,
दादासाहेब कचरू माळवदे, योगिता दादासाहेब माळवदे, हर्षल आण्णासाहेब माळवदे (सर्व राहणार मुसळवाडी, ता. राहुरी) या आठ जणांवर मारहाण व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.