अहमदनगर दक्षिण

प्रवरा उजव्या कालव्यात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील गुहा-पिंपळगाव शिवहद्दीत प्रवरा उजव्या कालव्यात एका 40 वर्ष वयाच्या अनळखी महिलेचे कुजलेल्या अवस्थेतील प्रेत पाण्यावर तरंग असल्याचे स्थानिक नागरीकांनी पाहिल्या नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गुहा पिंपळगाव शिव हद्दीतील प्रवरा उजव्या कालव्यात कुजलेल्या अवस्थेतील 40 वर्ष वयाच्या महिलेचे प्रेत मिळून आले.

प्रवरा उजवा कालव्यातुन रोटेशन सुरु असुन सदर महिलेचे प्रेत या ठिकाणी कसे आले. पाण्याच्या प्रवाहात वाहत आले. बुधवारी दुपारी स्थानिक नागरीकांनी पाण्यावर तरंत असलेले महिलेचे प्रेत पाहिले.

येथिल पोलिस पाटील व सरपंच यांना या प्रेताबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळवली.

त्यानुसार राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नाना सुर्यवंशी यांच्यासह साहय्यक फौजदार एन आर शिंदे, पो.हे.काँ. लक्ष्मण बोडखे यांनी धाव घेतली.

प्रवरा उजव्या कालव्यातील पाण्यावर तरंत असलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढला असता मृतदेह पुर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले.

उपसरपंच राम बर्डे, साई प्रतिष्ठाणचे रुग्णवाहीनी चालक रविंद्र देवगिरे तसेच स्थानिक गावकरी यांनी मदत केली .

Ahmednagarlive24 Office