अहमदनगर दक्षिण

खळबळजनक ! बारा वर्षाच्या मुलीचा चौदा वर्षाच्या मुलाशी विवाह लावला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील नगर जिल्ह्यात बालविवाहाच्या घटना घडताना दिसून येत आहे. नुकतेच अशीच एक खळबळजनक घटना नगर जिल्ह्यात घडली आहे.

केवळ बारा वर्षाची मुलगी आणि चौदा वर्षाच्या मुलाच्या लग्न सोहळा प्रशासनाच्या नावावर टिच्चून लावला गेला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, हा विवाह काही दिवसां पूर्वीच श्रीगोंदयात होणार होता, मात्र मुलीच्या आईच्या तक्रारीने तो शक्य झाला नाही.

मात्र त्यानंतर सदर अल्पवयीन मुलगी-मुलगा यांचा विवाह श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावात पार पडल्याची माहिती मिळते आहे.

दरम्यान याबाबत अहमदनगरच्या चाईल्ड लाईन संस्थेने पाठपुरावा सुरू केला असून संबंधितांना बाल कल्याण समिती समोर संबंधित दोन्ही पार्टी, ग्रामसेवक यांना बोलावले आहे.

याप्रकरणी बेलवंडी(श्रीगोंदा) पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यासाठी मुलीची आई आदी गेलेले असल्याची माहिती समोर येत आहे.

Ahmednagarlive24 Office