अहमदनगर दक्षिण

दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी शस्त्रसाठ्यासह जेरबंद

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2022 Ahmednagar Crime :- राहुरी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत राहुरी तालुक्यातील गुहा येथील तिघांचा समावेश आहे.

दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी, नगर-मनमाड महामार्गावर राहुरी कारखानानजिक गुंजाळ नाका परिसरातील पेट्रोल पंप परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी असल्याची माहिती पोलिसांना समजली.

माहिती कन्फर्महोताच पोलीस कर्मचार्‍यांनी त्या ठिकाणी जाऊन सहा दरोडेखोरांना गजाआड केले. या दरोडेखोरांकडून दोन विनाक्रमांकाच्या मोटारसायकल, एक लोखंडी सत्तुर, लोखंडी गज, मिरचीपूड, वस्तारा व चाकू अशा एकूण 90 हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक प्रवीण आहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समीर हंसराज शेख ( वय 39 राहणार गुहा, तालुका राहुरी), कय्युम अब्बास शेख( वय 28, राहणार लोहगाव पुणे), गणेश नामदेव कोरडे (वय 35, राहणार हिंगणगाव ता.नगर ), अजय जॉन ओहोळ(वय 25 राहणार, गुहा ता.राहुरी), दीपक रामनाथ पवार (वय 19, राहणार नांदगाव ता.नगर), अजीज अकबर शेख (वय-35, रा.गुहा ता.राहुरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

Ahmednagarlive24 Office