अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2022 :- गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगणाऱ्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. शरीफ उर्फ गोट्या अकबर पठाण (वय ३० रा.बसस्टँडच्या पाठीमागे, नेवासा) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.
त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचा गावठी कट्टा व ६०० रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे असा ३० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील शेंडी बायपास ते दूध डेअरी चौक एमआयडीसीकडे जाणारे रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलीस नाईक संदीप संजय दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पठाण विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस करीत आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकातील सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे,
पोलीस अंमलदार दत्तात्रय गव्हाणे, संदीप दरंदले, संतोष लोंढे, ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, रवीकिरण सोनटक्के व संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.