अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात एटीएम फोडण्यासाठी गेलेले चोरटेच चक्क आतमध्ये फसल्याची घटना समोर आली आहे. शहरातून जाणाऱ्या जामखेड रस्त्यावर असलेल्या बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्यासाठी अज्ञात चोरटे केबिनच्या आत गेले.
कुणाला काही समजू नये म्हणून एटीएमचे शटर आतून लावून घेत मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना एटीएम मशीन फोडता न आल्याने त्यांचा प्रयत्न फसला.
बाहेर निघण्यासाठी चोरट्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शटर उघडता आले नसल्याने चोरटे आतच फसले. बाहेर येण्यासाठी गॅस कटरचा वापर करत शटर एका बाजूने कापून चोरटे बाहेर पडले.
चोरट्यांनी पळून जाताना त्यांच्या जवळ असलेले मिरची पूड, रॉकेल, भुसा, पोते घटनास्थळी सोडून दिले.
घटनेची माहिती समजताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असत. एटीएम मशीन एका बाजूने कापण्यात आले असल्याचे सांगत. या घटनेत कोणतीही रोकड गेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.