Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील खर्डा, घोडेगाव, पिंपरखेड, फक्राबाद, वंजारवाडी, या गावांसह अनेक भागात आज (दि. २८) नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास आचानक वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जामखेड तालुक्यात यावर्षी अल्पपर्जन्यवृष्टी झाल्याने खरिपाचा हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काही लागलेच नाही. शेतकऱ्यांनी थोडया फार पाण्यावर घेतलेली पिके आज झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
अवकाळीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे महसूल विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. तालुक्यातील खर्डा जिल्हा परिषद गट, जिल्हा परिषद गट आणि जामखेड शहरातील अनेक भागात
मंगळवार (दि.२८) नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे उद्या सकाळी तातडीने पंचनामे करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.